तरुणांनी महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजेत – प्रदीप देसले
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तरुणांनी महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा अंगीकार करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवले पाहिजेत, असे प्रतिपादन व्याख्याते प्रदीप देसले यांनी केले.
येथील पीपल्स सोशल फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समाजप्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप देशमुख होते. यावेळी माजी खासदार उमेश पाटील, प्रमोद पाटील, शशिकांत साळुंखे, भगवान पाटील, शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, घृष्णेश्वर पाटील, सूर्यकांत ठाकूर, अभिषेक देशमुख, रोशन जाधव, संभा जाधव, अनिल ठाकरे, करण सूर्यवंशी, देवयानी ठाकरे, विजया पवार, वैशाली मोरे, इमरान शेख, दीपक राजपूत, सतीश महाजन, राहुल मस्के, गौतम जाधव, देविदास जाधव, स्वप्निल जाधव, सोनू अहिरे, प्रमोद आगोने, डी. एस. निकम, निलेश निकम, साई महाजन, अविनाश जाधव, अॅड. गौतम जाधव, राजेश जाधव, विजय जाधव, अॅड. विश्वजीत जगताप आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवसागर पाटील, मंगेश साळवे, दीपक मोरे, अरविंद खेडकर, शुभम महाजन, प्रणाल पवार, अमोल पवार, सौरभ पाटील, सौरभ त्रिभुवन, विजय भोळे, प्रवीण जाधव, श्रीकांत आव्हाड, राकेश सरोदे, राकेश त्रिभुवन, साई आव्हाड, सनी सरोदे, अक्षय रणधीर, चेतन आव्हाड, प्रशांत निकम, कुणाल अहिरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शुभम महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. निलेश निकम यांनी मानले.

<img class


