Wednesday, August 26, 2026
Homeजळगावडॉ. निलेश राणे यांची ‘ग्रीन ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती; पर्यावरण चळवळीला नवे बळ

डॉ. निलेश राणे यांची ‘ग्रीन ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती; पर्यावरण चळवळीला नवे बळ

डॉ. निलेश राणे यांची ‘ग्रीन ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती; पर्यावरण चळवळीला नवे बळ

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि 13
पृथ्वीची नैसर्गिक संसाधने, जैवविविधतेचे संवर्धन, निसर्गाशी सुसंवाद राखणे तसेच पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती आणि विविध हरित उपक्रमांमध्ये केलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत दिल्ली येथील ‘अर्थ ग्लोबल’ संस्थेने डॉ.निलेश राणे यांची ‘ग्रीन ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून जनजागृती घडवून आणण्यात डॉ. राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, या नियुक्तीमुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, तसेच युवकांमध्ये हरित विचारांची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सामाजिक व क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत डॉ. निलेश राणे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या