हिंगलाज माता दर्शन यात्रा उत्साहात संपन्न चाळीसगावहून ३५० सिंधी समाज भाविकांचा सहभाग
चाळीसगाव : खानदेश ला युनूस प्रतिनिधी सिंधी समाजाची कुलदेवी हिंगलाज माता दर्शन यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रविवार रोजी ७ वाजता चाळीसगाव येथून सुमारे ३५० भाविक—स्त्री, पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक—यांनी पाच बसेसमधून श्री क्षेत्र खेड उगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथील हिंगलाज माता दर्शनासाठी प्रस्थान केले.प्रस्थानापूर्वी कुलदेवी हिंगलाज माता व इष्टदेवता भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमांचे पूजन, आरती करून श्रीफळ फोडून यात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गात प्रथम श्री क्षेत्र नसतानपूर येथे सर्व भाविकांनी सामूहिक आरतीत सहभाग घेतला. यावेळी मंदिरातील पुजारी यांचा श्रीफळ, हार व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी नाश्ता करून पुढील प्रवासास सुरुवात केली.दुपारी सुमारे १ वाजता हिंगलाज माता मंदिर, उगाव येथे पोहोचून सर्वांनी सामूहिक दर्शन व महाआरती केली. तसेच सर्व समाजासाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंगलाज देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना हिंगलाज मातेची प्रतिमा भेट देण्यात आली.


सायंकाळी ५ वाजता भगवान झुलेलाल व हिंगलाज मातेच्या प्रतिमांची ट्रॅक्टरवरून गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी भजन-कीर्तन व जयघोष करत उत्साहात सहभाग नोंदवला. नदीकाठी पूजन करून प्रतिमांचे विसर्जन करण्यात आले.
यानंतर सर्व भाविकांनी पुन्हा दर्शन घेऊन चहा-पाण्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला. रात्री सुमारे १०.३० वाजता यात्रा सुखरूपरीत्या चाळीसगाव येथे परतली. “हिंगलाज माता” व “भगवान झुलेलाल” यांच्या जयघोषात यात्रा संपन्न झाली.या यात्रेचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी सिंधी समाजातील सुभाष बजाज, हरेश कलवानी, रामडेंबानी, ओम सचदेव, चेतन मंधानी, प्रदीप चावला, जितू वाधवानी, नगरसेवक विशाल कारडा, पप्पू चावला, भोला शेठ दोधाणी, दीपक आहुजा, किरण कारडा, रिकी सोनार तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

