Tuesday, April 14, 2026
Homeगुन्हापत्रकाराला धमकी; अदखलपात्र नोंद

पत्रकाराला धमकी; अदखलपात्र नोंद

पत्रकाराला धमकी; अदखलपात्र नोंद
चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 (जि. जळगाव) : शहरातील पत्रकार मुराद इब्राहिम पटेल (वय 48), पत्रकार , रा. हिरापुर रोड, सबस्टेशनजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NCR) नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, दि. 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजेच्या सुमारास जुना मालेगाव रोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी फिर्यादी उपस्थित असताना आरोपी किशनराव यशवंत जोर्वेकर (रा. चाळीसगाव), संपादक – दैनिक सर्वांचा ग्रामस्थ यांनी फिर्यादीला उद्देशून मोठ्याने धमकी दिल्याचा आरोप आहे.
“तू व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माझ्याविरुद्ध मोहीम चालवली आहे, ती तुला महागात पडेल. मी तुला बघून घेईन, तुला मार खावा लागेल,” अशा शब्दांत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या वेळी कार्यक्रमस्थळी शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वीही संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील काही लेखांवरून वाद निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोपीने मनात राग ठेवून फोनवरूनही धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत लेखी सूचना देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या