Wednesday, April 15, 2026
Homeजळगावशहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात या वर्षी ४० मिरवणूकाव्दारे जयंती जल्लोष

शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात या वर्षी ४० मिरवणूकाव्दारे जयंती जल्लोष

शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
या वर्षी ४० मिरवणूकाव्दारे जयंती जल्लोष

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले संपूर्ण शहर निळे ध्वज , बॅनर , पताका ,कमानी यांनी फुलून गेले होते . झाले. सोमवारी (दि.१३) रात्री ९ वाजल्यापासून महामानवांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अनुयायांनी मोठी गर्दी करून जल्लोष साजरा केला.
मंगळवारी दुपारपासून शहरातील विविध भागांतून तब्बल ४० भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेशन रोडवरील अवजड चारचाकी वाहतुकीवर दुपारनंतर बंदी घालण्यात आली असून जामनेर रोडवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती .
जयंती उत्सवाच्या निमित्ताने जामनेर रोड, यावल रोड आणि जळगाव मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. स्टेशन रोडपासून बसस्थानकापर्यंत तसेच सतारे ब्रीज ते महाराणा प्रताप चौक या परिसरातही भीमसैनिकांनी भव्य सजावट केली आहे. जुन्या पालिका इमारतीसमोरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराचे विशेष सुशोभीकरण करण्यात आले आहे.
यंदाच्या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे लंडन निवासस्थान याची ६० फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ही नेत्रदीपक आरास नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

 


उत्सवानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिरे, पुस्तक वितरण कार्यक्रम तसेच मिरवणूक मार्गावर थंड व शुद्ध पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. वंचित आघाडी व काँग्रेसतर्फेही विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आंबेडकर पुतळ्याजवळ एलईडी स्क्रीनद्वारे त्यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ व संग्रहित छायाचित्रांचे दर्शन घडवण्यात येत आहे, ज्यामुळे उपस्थितांना त्यांच्या कार्याची उजळणी करता येत आहे.
शहरभरातून ४० मिरवणूका डी जे च्या वादयात निघाल्या यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता . भीमगीता वर तरुणांनी उत्कृष्ठ नृत्य सादरीकरण केले .
य संपूर्ण जयंती उत्सवासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोनू नेतकर आणि सर्व भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे.
डी वाय एस पी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पी आय राहुल वाघ , शहर पो . स्टे चे उद्धव दमाडे पोलिस स्टॉफ , होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या