Thursday, April 16, 2026
Homeजळगावभुसावळ येथे भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ येथे भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ येथे भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी

शहरात ब्राह्मण समाजा चे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम जन्मोत्सव निमिताने भरगच्च कार्यक्रम द्वारा मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करण्यात येतो दरवर्षी आणि विशेष बाब म्हणजे शोभायात्रा मध्ये डी जे न लावता पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात महिलाच्या लेझीम पथक मुलीच्या तलवार व परशुराम भगवान यांचे अस्त्र फरसा ,पथक ध्वज पथक भगवान परशुराम ची प्रतिमा आणि पालखी असा शोभायात्रे च्या स्वरूप असते . दर वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा समितीची निवड करण्यात येते यात समस्त सकल ब्राह्मण समाज एकजुटीने सहभागी होऊन सर्व जण आपल्या सर्वस्व पणाला लावतात आणि तीन दिवसीय कार्यक्रम द्वारा भगवान परशुराम यांच्या चरणी तीन पुष्प अर्पण करण्यात येतात .

पहिला पुष्प व्याख्यान माळ च्या रूपात १७/०४/२२६ रोजी संध्याकाळी ७:०० ते ८:०० वाजता ब्राह्मण संघ न्यू एरिया वार्ड भुसावळ वक्ते सो अनघ्या कुलकर्णी (भुसावळ)
त्याच दिवशी ८:०० ते ९:०० व्याख्यान वक्ते श्री राजेश जी बहुगुणा (ऋषिकेश उतरांचल)
दुसरा पुष्प दिनांक १८/०४/२०२६ रोजी
भव्य मोटर साईकिल रॅली
वेळ—संध्याकाळी ठीक ५:३० वाजता
ठिकाण—-श्री साई बाबा मंदिर जामनेर रोड भुसावळ
समापन—श्री भगवान परशुराम मंदिर तापी नदी किनारी भुसावळ
तिसरा अंतिम पुष्प १९/०४/२०२६ रोजी
भव्य-दिव्य शोभायात्रा

 


वेळ संध्याकाळी ठीक ५:३० वाजता
ठिकाण—श्री अष्टभुजा माता मंदिर भुसावळ
समापण-श्री राम मंदिर म्युनिसिपल पार्क भुसावळ
राम मंदिर म्युनिसिपल पार्क येथे महाप्रसाद (भोजन जेवण)व्यवस्था ठीक ८:०० वाजे पासून सुरू करण्यात येईल सर्वांनी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
या परशुराम जयंती च्या अनुषंगाने बैठक घेऊन सर्वानुमते कार्यकारिणीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली
अध्यक्ष- वेदप्रकाश जी ओझा
उपाध्यक्ष-रोहित कुलकर्णी,आदित्य शर्मा
सचिव —घनश्याम मिश्रा
कोषाध्यक्ष—देवेश कुलकर्णी , धनंजय कुलकर्णी अशी कार्यकारिणी ची निवड करण्यात आली आहे .
या प्रसंगी माजी समिती अध्यक्ष भूषण जोशी,कैलाश उपाध्याय,जयप्रकाश शुक्ला,उमाकांत शर्मा (नमा),अनिरुद्ध कुलकर्णी,भूषण वैध,प्रवीण मिश्रा,आशिष तिवारी,आनंद जोशी,आमचे ज्येष्ठ ए के तिवारी जी,गौरव हिंगवे,उमेश जोशी,किशोर जोशी डॉक्टर सुधीर ओझा आदि सकल समस्त ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या