हिंगोणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न.


यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१६ तालुक्यातील भालोद मंडळात
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दि.१५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन त्यात ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन फैजपुर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबीरामध्ये देण्यात आलेले ठळक लाभ जिवंत सातबारा वाटप एकूण वारस नोंदी : 119
प्रातिनिधिक वाटप : 13,उत्पन्न दाखले वाटप 12, शिधापत्रिका वाटप – 09 जात प्रमाणपत्र वाटप – 11, तुकडा शेरा कमी करणे (७/१२ उतारा व आदेश)
एकूण तुकडा सातबारा : 1324
पात्र प्रकरणे : 1103 प्रातिनिधिक वाटप :11अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र – 08 विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी 112, लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप 03,आदिवासी खातेदार नोंदी – 04, घरकुल लाभ – 25,आयुष्मान कार्ड (आरोग्य विभाग ) – 21, बेबी किट वाटप – 21, ट्रॅक्टर वाटप – 02 करण्यात आले.

