Sunday, April 19, 2026
Homeगुन्हाएटीएम फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत

एटीएम फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत

: एटीएम फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत
चाळीसगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये कार्ड बदलून ४० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारास विकास भावलाल राठोड (वय ४०, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव) हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता एका अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा सोनुकुमार पंचानंद सनगही (वय ३२, रा. भमरपुर, बनेसार चौक, बिहार) याने केल्याचे निष्पन्न झाले.आरोपी पडेगाव (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.आरोपीस चाळीसगाव येथे आणून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या