Thursday, April 23, 2026
Homeजळगावललवाणी ॲग्रो म्हणजे भुसावळ, जामनेर, जळगाव, बोदवडकरांसह परिसरासाठी मनोरंजनाची पर्वणी - मंत्री...

ललवाणी ॲग्रो म्हणजे भुसावळ, जामनेर, जळगाव, बोदवडकरांसह परिसरासाठी मनोरंजनाची पर्वणी – मंत्री संजय सावकार यांचे प्रतिपादन

ललवाणी ॲग्रो म्हणजे भुसावळ, जामनेर, जळगाव, बोदवडकरांसह परिसरासाठी मनोरंजनाची पर्वणी – मंत्री संजय सावकार यांचे प्रतिपादन                         भुसावळ : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या कुऱ्हे पानाचे या शिवारातील प्रा.डॉ. डि.एम.ललवाणी यांनी सुरु केलेल्या ललवाणी ऍग्रो टुरिझम,मन-जिया रेस्टारंट व विविध प्रकल्पाचे उदघाटन वस्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, विधान परिषदेचे माजी आमदार मनीष जैन, उद्योजक राधेशाम लाहोटी, शैक्षणिक क्षेत्राचा महामेरू संजय गरुड, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, जळगावचे प्रसिद्ध वकील अकील ईस्माईल यांच्या शुभहस्ते व मोठ्या संखेने उपस्थित असलेल्या रसीकांच्या साक्षीने पार पडले.
या मनमोहक कार्यक्रमा प्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी नमूद केले की ललवाणी ॲग्रो टुरिझम हे भुसावळ, जामनेर ,जळगाव, बोदवड यांच्या मध्य स्थानी असल्यामुळे सर्वांचे मनोरंजनाचे स्थान झाले आहे. तसेच या ठिकाणी अनेक नवनवीन कल्पना रुजू करण्यात येत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून ललवाणी परिवाराचे कौतुक केले. तसेच गायत्री भंगाळे यांनी सुद्धा या उपक्रमास शुभेच्छा देऊन मी ज्यावेळेस प्रवेश केला तर मला फारच सुखद आणि आल्हाददायक धक्का बसल्याचे नमूद केले. माजी आमदार मनीष ललवाणी यांनी मी ललवाणी परिवाराचा घटक असून ललवाणी परिवाराने केलेल्या या कामगिरीचे कौतुक करून प्रा. डॉ. दिलीप ललवाणी हे करीत असलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. तसेच त्यांच्या मनात काय नवनवीन संकल्पना रुजू होत असतात व त्या संकल्पनाचे स्वप्नातील पूर्ती करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात .आज सुद्धा ते जरी ६६ वर्षाचे झाले तरीही तरुणासारखे काम करीत आहेत .खरोखरच त्यांचे कौतुक करावेत तेवढे थोडे असे नमूद केले. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी संघर्षातून प्राध्यापक ललवाणी यांनी जीवन उभे केले व अनेक संघर्षांना धीराने तोंड देऊन एक विश्व निर्माण केल्याचे प्रतिपादन केले. प्रा. डॉ.ललवाणी यांचे बालपणीचे कॉलेज मित्र व शिक्षण सम्राट संजय गरुड यांनी आपल्या कॉलेज जीवनात सरांसोबतचे व्यतित केलेले क्षण नमूद करून त्यांच्या कार्याला सलाम केला व आमची ही दृढ मैत्री याबद्दल उजाळा दिला .राधेश्याम लाहोटी यांनी ललवाणी हे रिटायर झाले नसून ते पुन्हा रीसायकलिंग प्रमाणे नव्या दमाने नवनवीन कार्य करीत असून गोसेवा हा त्यांचा मुख्य संकल्प असून खरोखरच एक उत्कृष्ट गो शाळेची निर्मिती त्यांनी केली असून परिसरातील गोभक्तांना सेवा करण्याची संधी निर्माण केली आहे. एडवोकेट अकील इस्माईल यांनी सुद्धा माझे मोठे बंधू ललवाणी सर यांचा उल्लेख करून त्यांच्या आलेल्या प्रत्येक संघर्षाच्या जीवनाचा मी साक्षीदार असून त्या संघर्षाला तोंड देण्याचं हिम्मत त्यांनी कशी दाखवली याबाबत वर्णन करून ललवाणी सरांनी आपल्या जीवनात कधीच नफा हा विचार न करता फक्त माणसे जमवणे, प्रेम मिळवणे, आपुलकी निर्माण करणे हीच त्यांची संपत्ती असल्याचे नमूद केले .
या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे सर्व वातावरण निसर्गमय झालेलं होतं सर्व प्रमुख पाहुणे यांना उदघाटन स्थळी सजवलेल्या बैलगाडीवरून नेण्यात आले व सर्वांचे स्वागत सनई चौघडेद्वारे करण्यात आले .याप्रसंगी परिसरातील व भूसावळ जामनेर, जळगाव मधील असंख्य व्यक्ती उपस्थित होत्या .सर्वांनी या मनोरम्य कार्यक्रमाचा आस्वाद लुटला व तसेच एक उत्कृष्ट कार्यक्रमास आम्हास उपस्थित राहता आलं हे समाधान व्यक्त केलं .

 

उपस्थितांचे स्वागत मदनलाजी ललवाणी, नलीन ललवाणी, प्रा.डाँ.ललवाणी, आदेश ललवाणी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरती व सौ.लता जैन व सौ शोभा ललवानी यांनी गायलेल्या नवकार महामंत्राने करण्यात आली. डॉ. जीवन कटारिया यांनी आम्ही पाच पांडवांपैकी आमचा दिलीप ललवाणी खरोखरच एक धडपडणार, नवनवीन संकल्पना रुजवणार व कोणत्याही गोष्टीला धीर गंभीरपणे समर्थपणे तोंड देणारे व्यक्तिमत्व असल्याच नमूद केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका दिपाली सोनार यांनी खुमासदार पध्दतीने करुन आपले गुरु व सहयोगी सुध्दा प्रा.ललवाणी यांच्या आठवणीं विषद करुन श्रोत्यांच्या भावनेला हात घालुन मने जिंकली. हा कार्यक्रम जरी रात्री असला तरी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती ही या कार्यक्रमाची यशस्वीता दर्शवीते. कार्यक्रमानंतर सर्वांनी खास खानदेशी मेनूचा आस्वाद लुटला.स्वच्छता,टापटिपपणा,आल्हाददायक वातावरण,निसर्गाच लेण,निरव शांतता,
मनमोहकता,रेन डाँन्स,
बांबु हाउस कुटीर,पंचवटी,ऊत्क्रुष्ट निवास व्यवस्था,नेत्रसुखद रोषनाई या बाबत सर्व ऊपस्थीतांमध्ये समाधानाचे वातावरण होते.कार्यक्रमानंतर ज्युनीयर भाउ कदम यांचा हास्य काँमेडी प्रयोगाने कार्यक्रमास रंगत आली व सर्व ऊपस्थीत हास्य सागरात बुडुन गेले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या