Sunday, April 26, 2026
Homeजळगावछत्रपती शिवाजी महाराजांविषयीअवमानकारक वक्तव्यप्रकरणी बागेश्वरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीअवमानकारक वक्तव्यप्रकरणी बागेश्वरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीअवमानकारक वक्तव्यप्रकरणी बागेश्वरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
चाळीसगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्राची अस्मिता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत संभाजी सेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती ‘बागेश्वर’ याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, काही मंडळींकडून महाराष्ट्राचा इतिहास आणि संत परंपरेचा अवमान करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रवृत्तींवर तातडीने लगाम घालणे गरजेचे असून, संबंधित वक्तव्य ज्या कार्यक्रमात करण्यात आले, त्या वेळी मुख्यमंत्री उपस्थित असल्याने त्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यासोबतच, बागेश्वर यांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन तहसीलदार तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनाही देण्यात आले असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गिरीश पाटील, अविनाश काकडे, सचिन जाधव, लक्ष्मण बनकर, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या