श्री अनिरुद्ध आदेश व समर्पण पथकाद्वारे घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावल : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
अनिरुद्धात अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि इतर राज्यातील १०० च्यावर सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर रक्तदान शिबिराच्या आयोजन केले गेले.

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र भुसावळ येथे एकूण ५३ जणांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापुंच्या जीवनदायी कार्यात खारीचा वाटा उचलला. उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा खूप जाणवतो. या महत्त्वपूर्ण विचाराने संपूर्ण भारतभर या महारक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते. भुसावळचे ४५ डिग्रीतापमान असूनही सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या जीवनदायी उपक्रमात उत्साहाने आणि जोशाने सर्वांनी रक्तदान केले. सकाळी ९ ते ३ यावेळेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव रक्तपेढीच्या चमुने रक्त संकलन केले. यावेळी अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

