Monday, July 6, 2026
Homeचाळीसगावहेड-घाटात कार अपघात; पोलीस हेडकॉन्स्टेबलसह चौघे जखमी

हेड-घाटात कार अपघात; पोलीस हेडकॉन्स्टेबलसह चौघे जखमी

हेड-घाटात कार अपघात; पोलीस हेडकॉन्स्टेबलसह चौघे जखमी
: चाळीसगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            ते घाट मार्गावरील म्हसोबा मंदिराजवळ रविवारी (दि. 26 एप्रिल) सायंकाळी सुमारे 4.45 वाजता कार अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 01 बीवाय 5371 क्रमांकाची कार चाळीसगावहून कन्नडकडे घाटातून जात असताना वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन घसरून रस्त्याच्या कडेला अडकले. या अपघातात कारमधील दिनेश बारड (वय 51, पोलीस

Oplus_131072

<img class

 

 

हेडकॉन्स्टेबल), तेजश्री बारड (48), नंदिनी बारड (22) व वेदांत बारड (18, सर्व रा. ) हे चौघे जखमी झाले. त्यांना पाय व कमरेस दुखापत झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, डीएएसआय संदीप पाटील, हेडकॉन्स्टेबल संदीप जगताप, अमीर तडवी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळू बाविस्कर व अन्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून मदतकार्य केले.
सदर अपघात चाळीसगाव पोलीस केंद्रापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर घडला असून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बचावकार्य पूर्ण करण्यात आले. महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या