Tuesday, April 28, 2026
Homeजळगावरा . कॉ .चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची दारूबंदीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...

रा . कॉ .चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची दारूबंदीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार .

रा . कॉ .चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची दारूबंदीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार .

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
भुसावळ रावेर यावल मुक्ताई नगर सह इतर तालुक्यात रसायनयुक्त, विषारी दारू मोठ्या प्रमाणात अवैधरित्या तयार करुन विकली जात असल्याचे महत्त्वाचे प्रकरण उघड झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मुंबईतील मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे तक्रार निवेदन दिले. सुनेत्रा पवार यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पानटपरी, किराणा दुकाने, भेळ आणि अंडा–ऑमलेट विक्रीच्या हातगाड्यांवर “पन्नी-फुगा” या नावाखाली रसायनयुक्त विषारी दारू सर्रास विकली जात आहे.
या दारू तयार करण्यासाठी ऑक्सिटोसीनसारखे घातक रसायन मोठ्या प्रमाणात वापरले जात असून, याच्या मागे एक व्यापक दारू–सिंडिकेट असल्याची अंदाज व्यक्त केला जात आहे .
अनेक तरुणांना या विषारी दारूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत, तरीही उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचे आरोप.
तक्रार निवेदनातील मुख्य मागण्या:
जळगाव जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर तात्काळ विशेष मोहिम राबून कठोर कारवाई करावी.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि विभागीय निरीक्षक अशा जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
रसायनयुक्त विषारी दारू तयार करण्याचे व विकण्याचे सिंडिकेट कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभावी यंत्रणेची कार्यपद्धती राबवावी.

सुनेत्रा अजित पवार यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष सोपान दुट्टे आणि मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान यांच्या शिष्टमंडळाला योग्य व तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या तक्रारीच्या आधारे जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि घातक रसायनांचा वापर यावर कडक नियमन आणि कारवाईला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या