Tuesday, April 28, 2026
Homeगुन्हाब्रेकिंग - जळगावात आरोग्य विभागातील अधिकारी २ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात...

ब्रेकिंग – जळगावात आरोग्य विभागातील अधिकारी २ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !

ब्रेकिंग – जळगावात आरोग्य विभागातील अधिकारी २००० हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील आरोग्य विभागात लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (वय ४२) यांनी एका तक्रारदाराकडून नोकरीसंदर्भातील स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी ३,००० रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. नियोजनानुसार आरोपीने २,००० रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार पडली.या प्रकरणात आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान लो से आरोपीकडून २३० रुपयांची रोख रक्कम तसेच व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील तसेच पथकातील अधिकारी सुनील वानखेडे आणि बाळू मराठे यांनी सक्रिय सहभाग घेतला.या घटनेमुळे जिल्ह्यातील शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एसीबीच्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या