Tuesday, April 28, 2026
Homeगुन्हाभुसावळात खळबळ : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल!

भुसावळात खळबळ : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल!

भुसावळात खळबळ : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्याविरोधात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुंजाळ कॉलनी (भुसावळ) येथील माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी फेसबुकवरील काही पेजवर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच लेवा पाटील, मराठा व अनुसूचित समाजाविषयी अवमानजनक व द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचा आरोप आहे.याप्रकरणी नितीन जगन्नाथ नंदवने (वय ४२, जामनेर रोड, भुसावळ) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित फेसबुक पोस्टद्वारे विविध समाजांबाबत अत्यंत खालच्या स्तरावरील व अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १९६, २९९ व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या