Wednesday, April 29, 2026
Homeजळगावभुसावळच्या राजकारणाचा पंचनामा भाग ३

भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा भाग ३

भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा
भाग ३                                                           भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    लोणारी यांचा एक मताने पराभव झाला आणि पिंजारी नगराध्यक्ष झाले. काही महिन्यांनी पुन्हा उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी नगरसेवक युवराज लोणारी हे उमेदवार राहिले. ” दुधाची तहान ताकावर भागली ” या म्हणी प्रमाणे ते उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. याचे श्रेय सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी दोन्ही ने घेतले हे विशेष .
नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता असताना एस एल पाटील नावाची एक व्यक्ती उदयास आली. पाटील यांना भुसावळ नगर परिषदेत मारहाण झाल्याची घटना देखील घडली होती. एस.एल.पाटील हे या नगर परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी होते व पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी होते.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ने काही कामे केली , विषय मंजूर केला की, पाटील सरळ न्यायालयात जनहित याचिका दाखल करत असत. एस एल पाटील यांच्या वारंवार न्यायालयात जाण्याने शहराच्या विकासकामांना ब्रेक लागला.पाटील यांचे बोलविते धनी वेगळेच होते. शहरातील नागरिकांना त्यांच्याबद्दल ज्ञान आहे.उमेश नेमाडे यांच्या नगराध्यक्ष कारकिर्दीत या याचिका जोरात सुरु झाल्या होत्या भाजपाची सत्ता आल्यानंतर मात्र हे जागरूक महाशय गप्प बसले हे विशेष आहे. त्यांच्या मनासारखे झाले असल्यामुळे त्यांना भुसावळच्या जनतेच्या समस्यांशी आता काहीही देणे घेणे राहिले नव्हते असे म्हणणे चुकीचे वाटणार नाही. भाजपा सत्तेत आल्यानंतर शहरातील समस्या अधिक तीव्र झाल्या होत्या तरी एस. एल .पाटील हे शांतच राहिले होते. त्यांच्या बोलवित्या धनी ची किंवा त्यांची वृत्ती किती भयंकर असेल यावरून कल्पना येते. २०१४ ला ना.सावकारे यांनी भाजप कडून विधानसभा निवडणूक लढवून माजी आ.संतोष चौधरी यांच्या पेक्षा अधिक मात्ताधिक्याने विजय मिळविला. त्यांच्या मत्ताधिक्या मिळविण्याचा आलेख प्रत्येक विधानसभा निवडणुकीत वाढतच आहे.
२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सरकार नगर परिषदेवर आले. यातही सावकारे समर्थकांना भाजपाची उमेदवारी मिळाली . जुने नवे या शीत युद्धात नव्यांना संधी मिळाली. भाजपवर टीका करणारे अनेक जण अनेक पक्ष बदलून येऊन निष्ठावान झाले. याचे श्रेय आमदारांनाच जाते. चौधरी यांनी असा प्रकार कधी केला असल्याचे जाणवत नाही. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रेवेश केल्या नंतर आपले कार्यकर्ते संभाळले पण राष्ट्रवादीतील जुन्या लोकांना सन्मान दिला, पदे आणि उमेदवारी देखील दिल्या होत्या. आपल्या समर्थकांना सांभाळतांना जुने दुखावले जाणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली होती.
संतोष चौधरी एनसीपी मध्ये आले म्हणून कुणाला पक्ष किंवा पदे सोडावी लागली नव्हती. काही काळाने वासुदेव इंगळे यांनीत्यांच्या सहकाऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रेवेश केला होता हा एकच अपवाद होता आणि याला देखील वेगळी किनार होती असे बोलले जाते.
भाजपाचे रमण देविदास भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. तेव्हा राज्यात भाजपाचे सरकार होते. नगर परिषदेत भाजपचे सरकार , आमदार भाजपचा ,पालक मंत्री भाजपचा , नगराध्यक्ष भाजप चा बहुमत भाजपचे तरी देखील भुसावळ शहरात नेत्रदीपक विकास कामे झाली नाहीत. एस .एल.पाटील सारखे लोक सुद्धा गप्प होते. तरी सुद्धा शहराच्या विकासाला ब्रेक लागला.
माजी आ.संतोष चौधरी हे नगराध्यक्ष असताना त्यांनी राज्यातील सरकारचा पुरेपूर उपयोग भुसावळ च्या विकासासाठी करून घेतला. ते आमदार झाल्यानंतर हि हाच कित्ता गिरवला गेला. आ.संजय सावकारे हे पालक मंत्री झाले तेव्हा नगर परिषदेत त्यांच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होता. ना.सावकारे यांना कामे करू दिली नसतील किंवा त्यांचे सहकार्य नाकारले असेल असेही होऊ शकते. परंतु भाजपची सत्ता असतांना असा कोणताही अडथडा किंवा अडचण नव्हती.
नगर परिषदेत भाजप सत्तेवर असताना विरोधी गट तटस्थ राहिला असे म्हणता येईल. परंतु भाजप सत्तेत असतांना ,बहुमत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात खास कामे झाली नाहीत. सत्ताधारी गटाचे नगर सेवक यांच्या प्रभागातील विषय आणि विरोधी गटातील नगरसेवकांच्या प्रभागातील विषय यांच्यात फार तफावत होती.
भुसावळ ते शिल्पकार अशी छाती असलेल्या माजी आ.संतोष चौधरी यांच्या पाठीशी लेवा समाजातील एक समुदाय होता. याच समुदायाच्या एक गट्टा मतांच्या पाठबळाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आ.चौधरी यांचे स्वीय सहाय्यक संजय सावकारे हे आमदार होण्यास हातभार लागला होता. हाच समुदाय नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सोबत उभा राहिला असल्याचे बोलले जाते. जात पडताळणी समितीने लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे भाग प्रमाणपत्र अवैध ठरविले. त्यामुळे एक गठ्ठा मतदान असलेला हा समुदाय भविष्यात कोणती भूमिका घेतो हे सुद्धा सस्पेन्स निर्माण करणारे असणार आहे. सामाजिक व राजकीय गणितांमध्ये अशा प्रकारचे समीकरण दूरवर परिणाम करणारे असतात.
क्रमश :

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या