Wednesday, April 29, 2026
Homeजळगावधरणगावजवळ भीषण अपघात: नववधूसह तिघांचा दुदैवी मृत्यू 

धरणगावजवळ भीषण अपघात: नववधूसह तिघांचा दुदैवी मृत्यू 

धरणगावजवळ भीषण अपघात: नववधूसह तिघांचा दुदैवी मृत्यू

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                       वराड गावाजवळ (धरणगाव तालुका) बुधवारी (२८ एप्रिल) सकाळी सुमारे ९ वाजता झालेल्या क्रूझर अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे निघालेल्या क्रूझर गाडीचे (MH 30 AZ 4710) चाक निखळल्याने वाहन उलटले. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून, जखमींना जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मृत्यू झालेल्या मध्ये

पूजा रवी वागडकर (२२, नववधू, अकोला)

दत्तू तुळशीराम भागवत (४२)

जगदीश चंद्रभूषण वागडकर (५२) यांचा समावेश आहे .

पूजा नुकताच वापी येथे लग्नबद्ध झाली होती आणि पहिल्यांदाच नातेवाईकांसोबत माहेरी परतत होती .

या भीषण अपघातात प्रेम भारत वाकडकर (२४)

नितेश सुरेश काठोडे (३५)

अमोल दामोदर गीते (३५)

रवी प्रभाकर वाघोडकर (३२)

तुळशीराम भीमराव भागवत (६७)

अंश नितेश काठोडे (१४) हे जखमी झाले आहेत .

घटना घडल्यावर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत केली. पोलिस तपास सुरू असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या