Thursday, August 20, 2026
Homeजळगावमहिला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे उद्‌‌घाटन संपन्न

महिला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे उद्‌‌घाटन संपन्न

महिला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे उद्‌‌घाटन संपन्न

जळगाव -खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे उद्‌घाटन महाविद‌यालयाचे प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रथम पुष्प प्रा डॉ. विनय पाटील यांनी माहिती प्रदुषण: सोशल मिडीयाचा आधुनिक समाजावरील प्रभाव आणि उच्च शिक्षणापुढील आव्हाने या विषयावर गुंफले त्यांनी बदलत्या शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण व अद्ययावत ज्ञान असणे व त्याचा मर्यादीत वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी ए. आय व समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावाचे फायदे व तोट्यांचे विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. निता पाटील यांनी केले तर आभार प्रा. रेणुका झांबरे यांनी मानले. या प्रसंगी महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. सतिश जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या