वरणगावजवळ तीन वाहनांचा भिषण अपघात एक ठार – तिन गंभीर .
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुक्ताईनगर महामार्गावर असलेल्या भारत गॅस गोडाऊन जवळ कार, ॲपेरीक्षा व दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या तीहेरी अपघातात एकाचा मृत्यु झाला तर तिन जण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथिल राष्ट्रीय महामार्गावरील लालमाती परिसरात भारत गॅस गोडाऊन जवळ दि २० गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास टोयाटो कार क्रं . एम . पी . o९ / ए झेड – २५५५ ने पुढे जाणाऱ्या मोटारसायकल क्र. एम . पी . ६८ / डि . ८७६८ ला कट मारुन ॲपेरीक्षा क्र .एम . एच . १९ / बी . व्ही . ६६८२ला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षातील प्रवाशी राजेश चव्हाण वय ४५ रा . फोकनार धाबे .दुर्गेश कुमार वय २५ बिहार व दूचाकीवरील

समाधान प्रकाश डोळे वय ५० ,व मनिषा समाधान डोळे वय३० राहणार जळगाव , हे गंभीर जखमी झाले त्यांना काही वाहन धारकांनी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी राजेश चव्हाण याचा मृत्यू झाल्याचे डॉ . डहाके यांनी सांगितले . उर्वरीत गंभीर जखमींना जळगांव जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे . अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल , व त्यांचे सहकारी प्रशांत ठाकूर , मनोज मस्के , यासीन पिंजारी , विकास वाघ व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुक कोंडी मोकळी करून चोख बंदोबस्त ठेवला . यातील दोन वाहने मध्य प्रदेश पासिंगची असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

