Sunday, May 3, 2026
Homeजळगावकार्यक्षम पोलीस श्री सूरज पाटील यांना डीजी पदकाने गौरव जळगाव पोलिस दलातील...

कार्यक्षम पोलीस श्री सूरज पाटील यांना डीजी पदकाने गौरव जळगाव पोलिस दलातील २० वर्षांच्या सक्षम सेवेचा सन्मान

कार्यक्षम पोलीस श्री सूरज पाटील यांना डीजी पदकाने गौरव जळगाव पोलिस दलातील २० वर्षांच्या सक्षम सेवेचा सन्मान

जळगाव, खान्देश लाईव्ह न्यूज                            जळगाव जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस कर्मचारी श्री सूरज पाटील यांच्या उत्कृष्ट सेवेला सर्वोच्च मान्यता मिळाली आहे. मुंबई पोलीस दलात भरती झाल्यानंतर २००७ मध्ये जळगाव जिल्ह्यात बदली होऊन आलेले श्री पाटील गेल्या सुमारे २० वर्षांपासून जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, एलसीबी जळगाव आणि सध्या डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथे सक्षमपणे कार्यरत आहेत.

 

Oplus_131072

त्यांनी दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, चोरी, खूनासह फसवणूक सारख्या विविध गुन्ह्यांचा नायनाट केला आहे. विशेषतः, त्यांच्या व्यापक नेटवर्कच्या जोरावर गोपनीय माहिती गोळा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली, ज्यामुळे अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले आणि समाजरक्षक म्हणून त्यांची छाप पडली. या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालक (डीजी) पदकाने सन्मानित करण्यात आले.

 

Oplus_131072

हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील साहेब आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) श्री. श्रीकांत धिवरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात श्री पाटील यांचे पूर्ण जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जळगावकरांसाठी हे अभिमानाचे क्षण आहेत!

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या