Friday, May 8, 2026
Homeमहाराष्ट्रअहमदाबाद येथील सुरेश चंद्रापूरे यांचे जावई आणि नंदुरबार येथील हिरालाल बोरसे यांचा...

अहमदाबाद येथील सुरेश चंद्रापूरे यांचे जावई आणि नंदुरबार येथील हिरालाल बोरसे यांचा मुलगा महेश बोरसे यांचे वाशिंग्टन मध्ये दुःखद निधन.

अहमदाबाद येथील सुरेश चंद्रापूरे यांचे जावई आणि नंदुरबार येथील हिरालाल बोरसे यांचा मुलगा महेश बोरसे यांचे वाशिंग्टन मध्ये दुःखद निधन.

धोबी समाजावर कोसळला दुःखाचा डोंगर!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – अहमदाबाद येथील सुरेश चंद्रापूरे यांचे जावई आणि नंदुरबार येथील हिरालाल बोरसे यांचा मुलगा महेश बोरसे यांचे वाशिंग्टन मध्ये दुःखद निधन झाल्याने संपूर्ण धोबी समाज बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
महाराष्ट्रातील नंदुरबार येथिल रहीवासी परंतु नोकरीनिमित्त परदेशात गेलेल्या युवकाचे ब्रेनस्ट्रोकमुळे दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मेंदुच्या शस्त्रक्रियेनंतर ४५ दिवसापासून कोमात असलेला युवकाचा अखेर दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची वार्ता नंदुरबार येथे पोहोचताच धोबी समाजात शोककळा पसरली.नंदुरबार येथील शिवाजीरोड परिसरात राहणारे धोबी समाजाचे ज्येष्ठ नागरीक हिरालाल तुळजाराम बोरसे यांचा मुलगा महेश हिरालाल बोरसे हा नोकरीनिमित्त लंडनजवळील वाशिंग्टन येथे गेल्या तीन वर्षापासून वास्तव्यास होता. दरम्यान,काही दिवसांपूर्वी महेश बोरसे या युवकाला मेंदुचा आजार झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.शस्त्रक्रियेनंतर महेश बोरसे हा युवक कोमात गेला होता.डॉक्टरांनी महेशला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.परंतू बुधवार दि.६ रोजी रात्री साडेबारा वाजता महेशचे दुखद निधन झाले.महेश बोरसेच्या निधनाची वार्ता नंदुरबारात आल्यानंतर धोबी समाजावर शोककळा पसरली.महेश बोरसे हा सर्वांचे मनमिळाऊ युवक होता. येथील शिवाजी रोड परिसरात तो लहानाचा मोठा झाला होता.
शिक्षणाचा बळावर परिवाराची प्रगती साधून स्वकर्तृत्व सिध्द करुन आता कुठे स्थिरस्थावर होत होता ४५ दिवसांचा संघर्षाला यश मिळाले नसल्याने पूर्व काळाने घात केला.तरुण वयात परदेशात महेशने घेतलेली एक्झीट साऱ्यांना चटका लावून गेली.त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन वर्षाचा मुलगा व तीन बहिणी असा परिवार आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या