भुसावळ नगराध्यक्ष पदभार विवाद: संतोष चौधरींचा ‘बेकायदेशीर’ ठपका

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शैलजा नारखेडे यांनी पदभार घेतला असला तरी तो पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
गायत्री भंगाळे यांनी कोणालाही लेखी चार्ज दिला नसल्याचे स्पष्ट करत, चौधरी म्हणाले, “नगराध्यक्षांच्या गैरहजरतेत चार्ज घेणे चुकीचे आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने पाहताय हे लोक!”
कोर्ट प्रकरण आणि अपात्रतेची तक्रार
सदर प्रकरण कोर्टात आहे.
शहरातील पुष्पा मॅडम यांनी सात नगरसेविकांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या नगरसेविकांच्या पतींनी नगरपालिकेच्या कारभारात ढवळाढवळ केल्याचा आरोप आहे. अपात्र होण्याची शक्यता असलेल्या नगरसेविका: प्राची पाटील, मेघा वाणी, शैलजा नारखेडे, आशा पाटील, छाया फालक, पुनम पाटील आणि प्रिया चौधरी. या असल्याचे चौधरी यांनी सांगितले, “भाजप नगरसेवक शहराची दिशाभूल करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आधी दिलेल्या आदेशावर आधारित हा बेकायदेशीर पदभार कार्यक्रम आयोजित झाला. गायत्री भंगाळे यांनी स्पष्ट केले की, कोणालाही लेखी चार्ज दिलेला नाही. अशा कृतीतून काही साध्य होत नाही.”
राजकीय तणाव वाढला
या विवादाने भुसावळ नगरपालिकेत राजकीय तणाव वाढला आहे. चौधरी यांनी इशारा दिला की, हे प्रकरण कोर्टात निकालात येईल आणि बेकायदेशीर कृत्यांना पाठीमागे हटवले जाईल.

