शहराला ४० दिवसापर्यंत पाणीटंचाई नाही.

पाण्याचा वापर काटकसरीने करा : नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील
यावल. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.९
यावल नगरपालिकेने हतनूर धरणाच्या आवर्तनाची मागणी केली होती ती मंजूर करण्यात आली असून सोमवार दि.११ मे २०२६ रोजी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने यावल नगर परिषदेच्या साठवण तलावात पुढील ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याने यावलकरांना पाणीटंचाई भासणार नसली तरी नागरिकांनी पाण्याचा अपाव्यय न करता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे यावल नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षां सौ.छायाताई अतुल पाटील यावल शहरातील नागरिकांना कळविले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे यावल नगरपरिषदेने दि.२१ एप्रिल व ३० एप्रिल २०२६ रोजी यावल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाणी आरक्षण मधून हातनूर कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्याबाबत मागणी केली होती आणि आहे त्यानुसार उपकार्यकारी अभियंता यांनी पाटबंधारे उपविभाग सावदा उपविभागीय अधिकारी यांना लेखी पत्र देऊन उजव्या कालव्याद्वारे पाणी प्रवाह सोडण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे यावल शहराला येत्या ४० दिवसापर्यंत पाणी टंचाई भासणार नाही असे लोकनियुक्त नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांनी यावल करांच्या माहितीसाठी कळविले आहे.

