Monday, May 11, 2026
Homeभुसावळभुसावळच्या नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडेंनी स्विकारला पदभार !

भुसावळच्या नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडेंनी स्विकारला पदभार !

पदभार बेकायदेशीर असल्याचा संतोष चौधरी यांचा दावा

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा श्रीमती गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची निवड महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याने शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अनुसूचित जाती (SC) आरक्षणावर निवडून आलेल्या भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांनी अवैध ठरवल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला होता.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शासनाच्या नगर विकास विभागाकडून आदेश क्रमांक एमयुएम-२०२६/प्र.क्र.१८७/नवि-१७, दिनांक ४ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. या आदेशानुसार, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे भंगाळे यांची नगरसेवक तसेच नगराध्यक्षा म्हणून निवड २३ एप्रिल २०२६ पासून भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल करण्यात आली आहे. संबंधित कारवाई महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१क) व (१ब) तसेच २००० च्या जाती प्रमाणपत्र पडताळणी अधिनियमातील कलम ६(१) अंतर्गत करण्यात आली आहे.
दरम्यान, भंगाळे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका खंडपीठाने गेल्या आठवड्यात फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या निर्णयामुळे भुसावळ नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये आता मोठा बदल झाला आहे. नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून आज पदभार सोपवला गेला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या