Monday, May 11, 2026
Homeजळगाव येथे विविध शासकीय विभागामार्फत जनतेच्या समस्यांचे जागेवर निराकरण

 येथे विविध शासकीय विभागामार्फत जनतेच्या समस्यांचे जागेवर निराकरण

येथे विविध शासकीय विभागामार्फत जनतेच्या समस्यांचे जागेवर निराकरण.

 

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.११   येथे मंगळवार दि.१२ रोजी “न्याय आपल्या दारी समाधान आपल्या हाती ” यानुसार विविध शासकीय विभागामार्फत जनतेच्या समस्यांचे जागेवर निराकरण आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

 

यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत सकाळी १० वाजता आयोजित केले असून या शिबिरात यावल नगरपालिका क्षेत्र, तसेच सातोद कोळवद ही गावे समाविष्ट आहेत. सदर शिबिरामध्ये सर्व शासकीय विभागाअंतर्गत जनतेच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत आमदार अमोल दादा जावळे,तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या