भाजपा नगरसेविकेच्या नेतृत्वाखाली देशमुख वाड्यातील महिलांसह नागरिकांचा न.पा.वर मोर्चा.

पाणी समस्या न सुटल्यास हंडा,घागर मोर्चा काढणार…
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१४
नगरपरिषद प्रभाग क्र.१० मध्ये तसेच देशमुख वाड्यासह यावल शहरातील अनेक भागात गेल्या महिन्यापासून अनियमित कमी दाबाने अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी भाजपा नगरसेविका सौ.नंदाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली देशमुख वाड्यातील महिलांसह नागरिकांनी मोर्चा काढून मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचून सुधारणा न झाल्यास नगरपरिषद संबंधित विभाग आणि नगराध्यक्षां यांच्याकडे हंडा / घागर
मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेविका सौ नंदाताई महाजन यांच्यासह महिला नागरिकांनी नमूद केले आहे की
प्रभाग क्रं. १० मधुन ( भा. ज. पा. ) नगरसेविका म्हणुन निवडुन आलेली आहे. प्रभाग क्रं. १० व संपुर्ण यावल शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे,गेल्या महिनाभरापासुन संपुर्ण यावल शहरात उशिराणे व कमी दाबाने पिण्याचे पाणी येत आहे.यावल नगर परिषदेमार्फत यावल शहरात कोणतीही नोटीस किंवा दंवडी न देता पाणिपुरवठा ३ दिवस उशिराने होत असुन पाणीपुवठ्याची कोणतीही वेळ निश्चित नाही.यापुर्वी पाणिपुरवठा विस्कळीत झाल्यास तशी नोटीस व दवंडी देण्यात येत होती.परंतु आता तशी व्यवस्था यावल शहरासाठी नाही.यावल शहरात शेती.मजुरी करणारा वर्ग असुन, सर्वांचे जिवन हे शेती व्यवसायावर अवलंबुन आहे.परंतु पाणीपुरवठ्याच्या अनिमित्त वेळेमुळे शेत मजुरांना घरी
बसुन राहावे लागत आहे.त्यामुळे त्यांच्या रोजंदारीवर परिणाम होत आहे.त्यामुळे शहरातील नागरीकांवर उपासमारीची येण्याची वेळ येत आहे.
यापुर्वीही नगरपरिषदेकडे निवेदन किंवा अर्ज देण्यासाठी गेले
असता,नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे निवेदकास अरेरावीची भाषा वापरुन निवेदन / अर्ज घेण्यास नकार देतात. तरी यापुढे नियमित वेळेवर पाणीपुरवठा करावा अन्यथा नगर परिषदेवर संबंधित कर्मचारी नगराध्यक्ष यांच्याकडे अंडा किंवा दादर मोर्चा काढण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
दिलेल्या निवेदनात भागवत पवार, दिलीप पवार, सुनील पवार, मीना वराडे,निशा ढाके,रोहिणी झोपे, वैशाली सावळे, गोकुळ डाके आनंदा खैरे,गोविंदा खैरे, संदीप खैरे, संतोष देशमुख किराणा देशमुख,रमेश देशमुख, दिलीप चव्हाण, भरत चव्हाण सुनील चव्हाण, मंगलाबाई, सुपडू देशमुख,इत्यादीची नावे असली तरी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी पाणीपुरवठा बाबत काय सुधारणा करतील किंवा नाही याकडे प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांसह यावल शहराचे लक्ष लागून आहे.
नगराध्यक्षां सौ.छायाताई पाटील
यावल नगर परिषदेच्या साठवण तलावात पाणीसाठ्याची पातळी कमी झाली होती. मे महिन्यात
तापमान वाढल्याने वीजपुरवठा सुद्धा अधून मधून खंडित होत आहे.पर्यायी अल्प प्रमाणात
पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता परंतु १२ तारखेला हातनूर कालव्यातून नगरपरिषदेच्या
साठवण तलावात पाणी आल्याने यावल शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे तरी विरोधकांनी यावल नगर परिषदेच्या कामकाजात काही तथ्य नसलेले राजकारण करू नये अशी रस्त जनहिताची अपेक्षा नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.

