Thursday, May 14, 2026
Homeआंदोलनआदिवासी युवकांच्या मृत्यू प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

आदिवासी युवकांच्या मृत्यू प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

“गरीब व आदिवासींवर अन्याय सहन करणार नाही” : आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुक्ताईनगर दुर्घटनेनंत राजकीय हालचाली वेगात; मंत्री गिरीश महाजनांशी आमदारांचा थेट संपर्क

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मुक्ताईनगर येथील स्मशानभूमी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण डंपर अपघातात आदिवासी समाजातील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मयतांच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पोलीस ठाण्यात भेट देत पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित कॉन्ट्रॅक्टरविरोधात कठोर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“गरीब, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत मयत कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या