Saturday, May 16, 2026
Homeआत्महत्यारेल्वे स्थानकाजवळ थरारक घटना : इंस्टाग्रामवर 'My Wife My Jaan' स्टेटस; काही...

रेल्वे स्थानकाजवळ थरारक घटना : इंस्टाग्रामवर ‘My Wife My Jaan’ स्टेटस; काही क्षणांत रेल्वेखाली झोकून आत्महत्या

रेल्वे स्थानकाजवळ थरारक घटना : इंस्टाग्रामवर ‘My Wife My Jaan’ स्टेटस; काही क्षणांत रेल्वेखाली झोकून आत्महत्या

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – प्रेयसीसोबत घर सोडुन गेलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ घडली. मयत तरुणाचे नाव गणेश गोविंदा सोनवणे (वय १९, रा. नांद्रा) असे नाव असुन तो नांद्रा येथील रहिवासी होता. कुटुंबियांसह नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात आक्रोश केल्याने सन्नाटा होता.

 

गणेश याचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबध होते. दोघांनी ३ मे रोजी घर सोडले. शुक्रवारी हे प्रेमीयुगल येथील रेल्वेस्टेशनवर आले. याठिकाणाहून नातेवाईकांनी तरुणीला सोबत नेले. यानंतर नैराश्यात आलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. तत्पूर्वी त्याच्यासह प्रेयसीचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात ‘माय वाईफ माय जान’ असे असे स्टेटस ठेवले होते.यावेळी गणेशने आईला मोबाईलवरुन फोन केला. आईशी बोलताना म्हणाला, आई मी मोठी चुक केली. हा माझा तुला शेवटचा कॉल आहे, असे म्हणत धावत्या रेल्वेखाली झोकुन देत त्याने मृत्यूला कवटाळले. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येनंतर तब्बल २३ मिनिटेह त्याचा फोन सुरु होता. ही वार्ता कळताच गणेश याच्या कुटुंबियांसह नातेवाईक जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले. गणेश याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांना रडु कोसळले. व आक्रोश केला मयताची आई शोकमग्न होती काय बोलावे हे सुचत नव्हते चेहऱ्यावर भयाचे सावट होते मयत तरुणाची बहिणही शोकात बुडाली होती.

 

आज सकाळी आठ वाजता त्याचा आईला कॉल आला. मी तेव्हा शेतात गेली होती. मला माझ्या बहिणीशी बोलायचे आहे, असे म्हणाला होता. भाऊ ३ तारखेला गावातील मुलीला घेऊन निघुन गेला होता. तेव्हापासुन मुलीच्या कुटुंबियांकडून आम्हाला धमकाविले जात होते. भावालाही ते धमक्या देत होते, असा आरोप मयताच्या कुटुंबियांनी केला. आम्हाला न्याय मिळावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी कायदेशीरबाबीची पुर्तता रुग्णालयात केली. दुपारी शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात जावुन घटनास्थळी धाव घेतली. संपुर्ण प्रकार जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदशचा शोध घेतला. घटनेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याच्या तपासालाही गती दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेच्या अनुषंगाने तपास चालु होता. या प्रकरणात कॉल रेकॉर्डीग महत्वाचा पुरावा ठरणार आहे. या बाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या