नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील,अतुल पाटील यांचे व्यक्तिशः नाव घेऊन सोशल मीडियावर बदनामी.

नगर परिषद भाजप सदस्यां यांच्यावर राजकीय संस्काराचा अभाव.
नगराध्यक्ष यांची पत्रकार परिषद.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१६
यावल नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक अतुल पाटील यांचे व्यक्तिशः एकेरी भाषेत नाव घेऊन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी
यावल नगर परिषद भाजपाच्या सदस्या सौ.नंदा राजेंद्र महाजन आणि त्यांचा सुपुत्र ऋतिक राजेंद्र महाजन यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती देत भाजप सदस्या सौ.महाजन यांच्यावर राजकीय संस्काराचा अभाव असल्याचे सुद्धा अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावल नगर परिषदेच्या साठवण तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तसेच हातनूर धरणाच्या कालव्यात उशिराने आवर्तन सोडल्याने यावल नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला होता. परंतु पाणी पुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू झाला असला तरी राजकीय विरोध म्हणून नगरपरिषदेच्या सदस्या सौ.नंदा राजेंद्र महाजन व त्यांचा मुलगा ऋतिक राजेंद्र महाजन या दोघ आई आणि मुलाने माझी म्हणजे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक अतुल वसंतराव पाटील आणि नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांची व्यक्तिशः नावे घेऊन ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा त्यांनी बिन बुडाचा खोटा आरोप केलेला आहे. प्रभाग क्र.१० व ११ मधील नागरिकांना पाणी सोडू देत नाही असा खोटा आरोप केला आहे. आणि त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी पुरावा द्यावा नाही तर जाहीर माफी मागावी त्याच बरोबर नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून व्यक्तिगत त्यांच्याबद्दल एकेरी, उद्धट चुकीची भाषा व्हाट्सअपवर / सोशल मीडियावर ऑन कॅमेरा वापरली म्हणजेच् त्यांच्यावर राजकीय संस्काराचा अभाव दिसून आल्याने त्यांच्यावर जिल्हा सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.असे पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगण्यात आले.
यावलकरांना माहिती व्हावी म्हणून तसेच हे विरोधी नगरसेवक कसे खोटे आरोप आणि द्वेष बुद्धीने आणि केवळ त्यांचा व त्यांच्या पक्षाचा नगरपरिषद निवडणुकीत पराभव झाला आहे म्हणून आणि नपात त्यांची सत्ता नाही या कारणाने नगरपालिकेच्या कामकाजात व्यक्तिशः टार्गेट करून सौ. छाया पाटील व अतुल पाटील या दोन सदस्यांना टार्गेट केले जात आहे त्यांचा निषेध म्हणून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करीत निषेध व्यक्त केला.
यावल शहरातील जनतेला प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने वस्तुस्थिती माहिती व्हावी खोट्या आरोपांना यावल शहर थारा देत नाही आणि मी देखील खोटे आरोप या ठिकाणी ऐकून घेणार नाही. आम्ही मुद्द्यावर बांधणारे कार्यकर्ते आहोत म्हणून प्रतिवाद न करता त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आपण नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची सुद्धा माहिती अतुल पाटील,सौ.छायाताई पाटील यांनी संयुक्तपणे दिली.
पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन पराग सराफ यांनी केले पत्रकार परिषदेत शिवसेना ऊबाठा पदाधिकारी,तसेच हकीम शेठ शहराध्यक्ष काँग्रेस,करीम मन्यार,उमर शेठ,युनुस शेठ
शरद कोळी,संतोषी खर्चे,सागर चौधरी,निलेश बारी,सारंग बेहेडे आणि सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

