Tuesday, May 26, 2026
Homeजळगावग्रापलींग स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लाची महाराष्ट्र संघात झाली निवड . गुवाहाटी...

ग्रापलींग स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लाची महाराष्ट्र संघात झाली निवड . गुवाहाटी आसाम येथे पार पडणार स्पर्धा

ग्रापलींग स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लाची महाराष्ट्र संघात झाली निवड . गुवाहाटी आसाम येथे पार पडणार स्पर्धा

 

वरणगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               आसाम गुवाहाटी येथे दि .२९ मे ते ३१ मे रोजी पार पडणाऱ्या १९ व्या राष्ट्रीय ग्रॉपलींग चॅम्पीयन २०२६ स्पर्धेसाठी ६६ किलो गटात येथिल श्रीहनुमान व्यायाम शाळेच्या प्रणय संजय बावस्कर या कुस्तीपटूची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे .

 

Oplus_131072

आसाम मधील गुवाहाटी मधील दिसपूर येथिल भुगेश्वरी फुकोनानी इनडोअर स्टेडीयम मधे पार पडणार आहे . सदर स्पर्धकांना या कालावधीत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे . त्याला वस्ताद नामदेव मोरे टीम कोच संजय बावस्कर ‘दिलीप संगेले यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांचा श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनिल काळे ‘नामदेव मोरे बाळासाहेब चव्हाण ,एकनाथ भोई ‘ दिनेश देशमुख ‘ संजय चौधरी ‘ उत्तम भोई , ‘ चुडामण धनगर ‘ दिलीप मराठे , प्रशांत निकम ,श्रीराम भोई ‘ भैय्या सोनवणे ‘ महेश सोनवणे सुनिल बापू देशमुख ‘चाळीसगाव तसेच सर्व तालुका कमिटी सदस्य व व्यायाम शाळेचे संचालक यांनी सत्कार केला .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या