Friday, May 29, 2026
Homeगुन्हातालुक्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बाळगणारे व गोमास विक्री करणाऱ्यांवर...

तालुक्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बाळगणारे व गोमास विक्री करणाऱ्यांवर कारवाई. 

तालुक्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बाळगणारे व गोमास विक्री करणाऱ्यांवर कारवाई.

 

६० हजार रुपये किमतीचे २ गोवंश , १५० किलो गोमास जप्त.

 

 

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि.२८

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक व कत्तल होऊ नये म्हणून यावल पोलीस स्टेशन हद्दीत सावखेडासिम व यावल शहरात डांगपुरा व आठवडे बाजार भागातून गोवंश व गोमास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.यामुळे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात मोठी खळबळ झाली.

 

सावखेडासिम येथुन ३० हजार रुपये किमतीचे १५० किलो गोमास व ३० हजार किमतीचे २ गोवंश जप्त.

 

तालुक्यातील सावखेडा सिम येथे गोवंश बाळगताना व विक्री करीत असताना तसेच हत्या करण्याच्या उद्देशाने गोऱ्हा मिळून आल्याने सावखेडा सिमच्या २ विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी फिर्याद दिल्यावरून १ ) निसार रशीद कुरेशी वय-३० वर्षे रा.सावखेडासिम हा त्याचे राहते घरात गोवंश जनावराची कत्तल करुन ३० हजार रुपये किंमतीचे १५० किलो वजनाचे गोमांस बाळगतांना मिळुन आला.त्याचे घराचे मागे त्याचे मालकीचे एका बंदीस्त जागेत त्याने ३० हजार रुपये किमतीचे २ जिवंत गोवंश गो-हे हे कत्तलीच्या इराद्याने अज्ञात व्यक्तीकडून आणुन चारा-पाण्या विना बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळुन आला असुन (२) अब्दुल रहीम हमीद कुरेशी हा वय-४५ वर्षे रा.सावखेडासिम हा त्याचे मालकीचे पत्र्याचे शेडमध्ये गोवंश जनावराची कत्तल करुन ६ हजार किमतीचे किंमतीचे ३० किलो वजनाचे गोमांस विक्री करीत असतांना आढळून आला आहे म्हणुन दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सन २०१५ चे सुधारणेसह) कलम ५, ५ (अ ), ५ ( ब ), ५ ( क ), ९ ,९-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पीएसआय अनिल महाजन करीत आहे.

 

याचप्रमाणे यावल शहरात बुधवार दि.२७ च्या रात्री यावल पोलिसांनी आठवडे बाजार व डांगपुरा भागात कॉम्बिंग ऑपरेशन करीत गोवंश ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, पीएसआय अनिल महाजन,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे,हे.कॉ.मोहन तायडे पोलीस पथकाने शहरातील मुस्लिम भागात कॉम्बिंग

ऑपरेशन राबविले यात पोलिसांनी गोवंश ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ झाली.कॉम्बिंग ऑपरेशन करताना यावल पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता. याबाबत आज गुरुवार दि.२८ रोजी सकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या