Friday, May 29, 2026
Homeगुन्हायावलमध्ये गोमास कत्तल प्रकरणाने खळबळ; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

यावलमध्ये गोमास कत्तल प्रकरणाने खळबळ; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

गोमास कत्तलीतील प्रमुख आरोपी शांतता कमिटी सदस्याचा मुलगा..?

शांतता बैठकीनंतरच गोमास प्रकरण उघड; नागरिकांमध्ये संताप

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी छापा टाकून २० हजार रुपये किमतीचा जिवंत गोऱ्हा, १०० किलो कच्चे गोमांस तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शांतता कमिटीतील एका ज्येष्ठ सदस्याचा तसेच एका राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याचा मुलगा अथवा निकटवर्तीय असल्याची चर्चा शहरात रंगली असून त्यामुळे या कारवाईला अधिक संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शुक्रवार दि. २९ रोजी पहाटे साडेदोन वाजेच्या सुमारास यावल पोलिसांनी गुप्त माहितीनुसार कारवाई केली. यावल पोलीस स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावरील शेत गट क्रमांक २८७ अ मधील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आले.कारवाईदरम्यान पोलिसांना १०० किलो कच्चे गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच एक जिवंत गोवंशीय गोऱ्हा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी रियाज खान हाजी शब्बीर खान, अरबाज खान अजमल खान, जावेद खान नजीर खान कुरेशी तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दोन दिवसांपूर्वीच अतिरिक्त पोलीस अधीक्षक गावित यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेचच हे प्रकरण उघडकीस आल्याने शहरातील वातावरणात तणावाची चर्चा सुरू झाली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या