माजी आमदार शिरीषदादा यांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार प्रदान.

पुणे येथे ४ जूनला राष्ट्र सेवादल आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करणार..
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२८ महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक राजकीय क्षेत्रात भरीव अशी कामगिरी असणारे तसेच यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, व सर्व जाती धर्म क्षेत्रातील यशस्वी कार्याची दखल घेऊन माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यावल रावेर विधानसभा क्षेत्रातील मा.शिरीषदादा चौधरी यांना राष्ट्र सेवा दलाच्या वतीने ” साने गुरूजी जीवन गौरव पुरस्कार ” जाहीर करण्यात आला आहे.त्यांना तो पुरस्कार दि.४ जून २०२६ रोजी साने गुरूजी स्मारक,पर्वती पायथा,पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.
मधुस्नेह परिवारासाठी ही आनंदाची व अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे.
त्यानिमित्त आदरणीय माजी आमदार शिरीषदादांवर धनाजी नाना विद्या प्रबोधिनी संस्था परिवाराचे उपाध्यक्ष सुनील मधुकर पाटील,सचिव प्रमोद रामभाऊ चौधरी,सहसचिव पुरुषोत्तम यशवंत पाटील,खजिनदार निळकंठ जगन्नाथ काळे, सदस्य चंदन सुधाकर अत्तरदे, विनय भास्कर पाटील यांच्यासह
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

