वैद्यकीय अधीक्षक कुरकुरे यांच्यावर राजकीय,सामाजिक,प्रसिद्धी माध्यमांनी मलमपट्टी केल्याने तत्काळ जखमी महिलेचे ड्रेसिंग झाले.

यावल दि.३० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी काल शुक्रवार दि.२९ रोजी यावल येथील देशमुख वाड्यातील माळी नामक महिला जखमी असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयात ड्रेसिंग करण्यासाठी गेली असता ग्रामीण रुग्णालयात मलमपट्टी करण्याचे साहित्य नसल्याचे सांगून महिलेचे ड्रेसिंग करण्यासाठी नकार दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की देशमुख वाड्यातील माळी नामक महिला आपल्या घरात स्वयंपाक करीत असताना कुकरचा स्फोट झाल्याने तिचा हात खांद्यापर्यंत भाजला गेला. तीने तातडीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव गाठून तेथे प्रथमउपचार करून घेतला तेथील डॉक्टरांनी सांगितले तुम्ही यावल येथे ग्रामीण रुग्णालयात ड्रेसिंग करून घेत चला असे सांगितल्याने ती महिला दि.२९ रोजी यावल ग्रामीण रुग्णालय गेली असता तिला रुग्णालयात ड्रेसिंगचे साहित्य नसल्याचे सांगून ड्रेसिंग करण्यासाठी नकार दिला.
त्या महिलेची व तिच्या कुटुंबीयांची परिस्थिती गरिबीची, हलाखीची असल्याने तिच्या हितचिंतकांनी सामाजिक बांधिलकीतून याबाबत समस्या मांडली असता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कुरकुरे यांच्याशी आज शनिवार दिनांक ३० रोजी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधला असता कुरकुरे यांनी प्रथम हास्यास्पद उडवा उडवीचे उत्तरे देऊन तुम्ही त्या महिलेची जखम किती खोल आहे किंवा नाही हे बघितले का..? असा उलट हास्यास्पद प्रश्न त्यांनी विचारला.यावर प्रतिनिधी त्यांना सांगितले की जळगाव सिव्हील मधून त्या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालय ड्रेसिंग करण्यासाठी पाठविले यात काहीतरी तथ्य आणि वस्तुस्थिती असल्याशिवाय आणि ग्रामीण रुग्णालयात ड्रेसिंग चे साहित्य असेलच् म्हणूनच त्या महिलेला पाठविले.असे सांगितले असता डॉक्टर कुरकुरे म्हणाले मी तपास करतो नेमके काय झाले. यावरून असे दिसून येते यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कुरकुरे हे ठराविक दिवशी आणि अनियमित वेळेवर ग्रामीण रुग्णालयात हजर असतात.
याबाबत सामाजिक राजकीय प्रसिद्धी माध्यमांनी जाब विचारल्याने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दुपारी त्या महिलेच्या हाताचे ड्रेसिंग करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुरकुरे यांच्याशी बोलणे केले असता ते
बेजबाबदार पणे किती उडवा उडवीची उत्तर देतात.. ते बघा

