धनंजय पाटील सरांच्या सेवानिवृत्ती निमित्त शिरसाड येथे कीर्तन कार्यक्रम संपन्न.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२
तालुक्यातील शिरसाड येथील गावाचे मा.उपसरपंच तथा वि.का.सोसायटीचे संचालक धनंजय एकनाथराव पाटील सर हे मुख्याध्यापक पदावरून प्रदीर्घ अशा ३९ वर्ष ज्ञानार्जनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. ३१ मे रोजीची सेवानिवृत्ती व १ जून रोजी असणारा वाढदिवस यासोबत ३ महिन्याची असणाऱ्या नात प्रिशाच्या स्वागता
निमित्ताने शिरसाड गावात जेवणाचा कार्यक्रम व शिवकीर्तनकर ह.भ.प.संजीव महाराज सोनवणे यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी धनंजय पाटील सरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला सोबतच घरात आलेल्या नात प्रिशाच्या स्वागतानिमित्त आध्यात्मिक रुपी शुभेच्छा दिल्या. कीर्तनात महाराजांनी देव, देश व धर्मासाठी काम करण्याचे आवाहन केले.कीर्तनाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून सर्वांना मंत्रमुग्ध केले. धनंजय पाटील सर हे यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील व तेजल पाटील यांचे वडील आहेत.धनंजय पाटील सरांना सेवानिवृत्ती निमित्त सकाळपासून राहत्या घरी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, शिक्षकवृंद, पंचक्रोशीतील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य धार्मिक व सामाजिक कार्यात सोबतच नातं प्रिशासाठी वेळ देण्याचे धनंजय पाटील सर यांनी सांगितले.

