Wednesday, June 3, 2026
Homeजळगावफैजपूर ची प्रिन्सिका चमकली महाराष्ट्राच्या स्टेजवर प्रिन्सिका सचिन भिडे हिने पटकावले 'Kids...

फैजपूर ची प्रिन्सिका चमकली महाराष्ट्राच्या स्टेजवर प्रिन्सिका सचिन भिडे हिने पटकावले ‘Kids Maharashtra 2026’ विजेतेपद     

फैजपूर ची प्रिन्सिका चमकली महाराष्ट्राच्या स्टेजवर प्रिन्सिका सचिन भिडे हिने पटकावले ‘Kids Maharashtra 2026’ विजेतेपद

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

*प्रिन्सिका सचिन भिडे* या चिमुकलीने महाराष्ट्रस्तरीय फॅशन स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘Kids Maharashtra 2026’ या भव्य फॅशन शोमध्ये किड्स कॅटेगरीतून सहभाग घेतलेल्या 30 अंतिम स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत तिने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

 

राज्यातील नामवंत मॉडेल्स, कोरिओग्राफर्स आणि परीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत आपल्या आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक आणि व्यक्तिमत्त्वाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘Kids. MAHARASHTRA 2026 Kids. WINNER’ हा सॅश आणि विजेतेपदाचा मुकुट तिने मोठ्या दिमाखात पटकावला.

 

 

सर्व स्तरातून प्रिन्सिका वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

संपूर्ण फैजपूर नगरीसाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रिन्सिकाला पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कु़. प्रिंसिका ही फैजपूर येथील कोरोयोग्राफर सचिन भिडे यांची कन्या आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या