Wednesday, June 10, 2026
Homeगुन्हापंचशील नगरात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १.४६ लाखांचा ऐवज लंपास !

पंचशील नगरात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १.४६ लाखांचा ऐवज लंपास !

पंचशील नगरात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १.४६ लाखांचा ऐवज लंपास !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरातील पंचशील नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे 1 लाख 46 हजार 200 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुभम विनायक जामनकार यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, 18 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून ते 7 जून 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.याच पंचशील नगर परिसरातील कुसुम हिरासिंग चंदेले (वय 70) यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करीत असून, चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या