पाल आश्रमामुळे साधकांचा अध्यात्मिक विकास :- श्री रसराज जी महाराज

पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पाल ता रावेर देशभरात काही ठिकाणी आश्रम किंवा मठ मंदिर नसल्याने तेथील बहुतांश लोकांचे जीवन भक्ती भावनेतून दूर असल्याचे वाटते परंतु जर गुरू आश्रम आपल्या परिसरात असले तर तेथील लोकांमध्ये अध्यात्मिक विकास दिसून येते.तसेच या रावेर तालुक्यात वसलेल्या पाल गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या पदस्परश्याने पावन झालेल्या या भूमीत श्री वृंदावन धाम आश्रम असल्याने या परिसरातील चैतन्य साधकांसह भाविक भक्तांमध्ये गुरुनिष्ठा आणि अध्यात्मिक विकास भरभरून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे परम पूज्य गुरुवर्य बापूजी समाधीत बसून साधकांच्या अंतर मनात वास करीत असून त्यांचेच कृपापात्र शिष्य या आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज साधकांना आपल्या
रसाळ अमृत वाणीद्वारे सत्संग अमृतातून भक्ती मार्ग दाखवीत असल्याचे श्री वृंदावन येथील मुलुख पिठाधीश्वर परम पूज्य संत श्री राजेंद्र दास जी महाराज यांचे कृपापात्र शिष्य परम पूज्य संत श्री रसराज जी महाराज यांनी दी ३१ मे रोजी पुरुषोत्तम मास पौर्णिमेच्या दिनी श्री वृंदावन धाम पाल आश्रमात आगमन प्रसंगी चैतन्य साधक परिवाराला सत्संग अमृत वाणीद्वारे उपदेश केले. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल चे वैभव आणि अध्यात्मिक अलौकिक विकास आणि साधकांची शिस्तप्रियता बघून संत श्री रसराज जी महाराज प्रसन्नमय वातावरणात मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.

या प्रसंगी व्यासपीठावर विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी संत श्री रसराज महाराजांचे स्वागत केले. या वेळी मथुरा आश्रमाचे संत श्री हरिशरणानंद जी महाराज, जामनेर चैतन्य धाम चे श्री श्याम चैतन्य जी महाराज, रावेर श्री दत्त मंदिर संस्थान चे ऋषिकेश महाराज यांच्या सह हजारो चैतन्य साधक उपस्थित होते.

