Thursday, June 11, 2026
Homeजळगावमराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे यांची निवड !

मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे यांची निवड !

राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनाला उपस्थिती !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील खान्देश लाईव्ह न्यूजचे संपादक संतोष खंडू शेलोडे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे ९ जून रोजी पार पडलेल्या मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे तसेच प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांच्या हस्ते शेलोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या भव्य अधिवेशनास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक स्वामी गौर गोपाल दास यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि प्रभावी कार्यक्षमतेची दखल घेत संतोष शेलोडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.अधिवेशनासाठी राज्यभरातील पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ येथून पत्रकार कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, वसंत कोलते, विनोद गोरधे आणि किशोर सावळे यांनीही अधिवेशनात सहभाग नोंदविला.
निवडीनंतर बोलताना संतोष शेलोडे यांनी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि विविध समस्यांविरोधात संघटितपणे आवाज उठवून त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या