Friday, June 12, 2026
Homeजळगावजिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर संतोष भाऊ शेलोडे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव !

जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर संतोष भाऊ शेलोडे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव !

जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर संतोष भाऊ शेलोडे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव !

भुसावळ प्रतिनिधी – खान्देश लाईव्ह न्यूजचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष भाऊ शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद भाऊ सावकारे मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हेमंत खंबायत, गजू भारंबे, सुमित बहाटे, वसंता पाटील, मनोज चौधरी आणि कैलास शेलोडे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेलोडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना संतोष भाऊ शेलोडे यांनी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या