Saturday, June 13, 2026
Homeजळगावनिधन वार्ता भानुदास लक्ष्मण आराक

निधन वार्ता भानुदास लक्ष्मण आराक

निधन वार्ता

भानुदास लक्ष्मण आराक

भुसावळ —   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            शहरातील अशोक नगर (सिंधी काॅलनी) येथील रहिवासी व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी भानुदास लक्ष्मण आराक (वय ७०)
यांचे १२ जून रोजी सकाळी ४ वाजता आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
ते मनोज आराक व गजानन आराक यांचे वडील तर उदय आराक यांचे आजोबा होत.
भानुदास लक्ष्मण आराक यांच्या निधनाची वार्ता कळताच अशोक नगर सिंधी काॅलनी परीसरात शोककळा पसरली. त्यांनी समाजातील प्रत्येक कार्यक्रमात तन मन धनाने मदत केली. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. ते प्रत्येकाशी आपुलकीने बोलून प्रत्येकाचा आदर करीत होते. त्यांच्या निधनामुळे आराक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर त्यांना दु:ख पेलण्याची शक्ती देवो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या