Sunday, June 14, 2026
Homeजळगावतापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी श्री. अनिल सुखदेव महाजन यांचे चिरंजीव प्रतिक अनिल महाजन (वय १६) याचा शनिवारी (दि. १३ जून २०२६) दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या दरम्यान तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक हा आपल्या एका मित्रासोबत तापी नदीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पोहत असताना तो पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रतिक याने नुकताच अकरावी इयत्तेत प्रवेश घेतला होता. अभ्यासू व मनमिळावू स्वभावामुळे तो मित्रपरिवारात परिचित होता. त्याच्या अकाली निधनामुळे महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गंगाराम प्लॉट परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक महाजन यांच्यावर शनिवारी सायंकाळी ७ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या