Wednesday, August 26, 2026
Homeजळगावसंतोष भाऊ शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यांचा...

संतोष भाऊ शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यांचा परीट सेवा मंडळातर्फे सत्कार

संतोष भाऊ शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यांचा परीट सेवा मंडळातर्फे सत्कार

 

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ येथील पत्रकार संतोष भाऊ  शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

 

Oplus_131072

मुंबई येथील पत्रकार संघाच्या  अधिवेशनात मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष  किरण जोशी , उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे,  प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांनी संतोष भाऊ शेलोडे यांना नियुक्ती पत्र प्रदान केले होते .

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ तसेच श्री संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था भुसावळ यांच्या विद्यमाने आपल्या समाजाचे आघाडीचे धडाडीचे जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे संतोष भाऊ शेलोडे यांचा सत्कार प्रसंगी  समाजबांधव जिल्हाध्यक्ष श्री कैलास भाऊ शेलोडे, श्री रमेशदादा ठाकरे, श्री लक्ष्मणभाऊ शेलोडे, श्री गोपाळभाऊ बाविस्कर, श्री बीसनभाऊ बाविस्कर, श्री माधवभाऊ बोरसे श्री नरेंद्र भाऊवाघ श्री प्रवीणभाऊ सोनवणे श्री मुकेश महाले श्री किरण महाले श्री निखिल सुरडकर श्री सुधाकर सपकाळे , पिंटू सपकाळे ,शंकर भाऊ शेलोडे आदी उपस्थित होते .

 

Oplus_131072

याप्रसंगी समाज बांधवांनी सांगितले की संतोष भाऊ शेलोडे हे आमचे समाज भूषण आहेत . यांचे कार्य महान असून त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने त्यांना हे पद प्रदान करण्यात आले आहे . पदामुळे  त्यांची आता जबाबदारी वाढली असून जिल्हास्तरावर जाणाऱ्या आमच्या समाज बांधवांच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा कायम असल्याचे त्यांनी सांगितले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या