महाराणा प्रताप जयंती वृक्ष लागवड संगोपनासहित साजरी करावी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील. यांच आवाहन भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी हिंदूसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंगजी यांची 17 जून 2026 तिथीनुसार जयंती, राजपूत समाजाबरोबर इतरही सर्व समाजाच्या कुठल्याही आपत्ती काळात संकट काळात साथ देणारा त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी , त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढणारा सर्वांना समान न्याय देणारा राजा म्हणून महाराज महाराणा प्रताप सिंगजी यांना राजपूत समाजाबरोबर इतरही सर्व समाजात आजही आदर्श राजा म्हणून ओळखले जातात व मानतात म्हणून राजपूत समाजाबरोबर इतरही सर्व समाज सर्व स्तरावर महाराज महाराणा प्रतापसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात महाराज महाराणा प्रतापसिंगजी यांना झाडे व घनदाट असलेले जंगल याविषयी नितांत आदर होता त्यांना झाडे म्हणजे जीव की प्राण होते सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, जंगल क्षेत्रात कमी झाल्याने वातावरणात अशुद्ध हवेची निर्मिती होत वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे आपणास अनेक आजारांसह इतरही आपत्तीचा सामना करावा लागत आहे जणू काही आपले सर्वांचे जीवन असुरक्षित झालेले आहे. तसेच निसर्गास आवश्यक असलेल्या इतरही सजीवसृष्टी धोक्यात आहे. आपल्या देशावर हे पर्यावरणाचे संकट मोठ्या प्रमाणात आहे तरी या संकटकाळी या जयंतीच्या निमित्ताने महाराजांना सर्वात प्रिय असलेले सर्व प्रकारची झाडे व घनदाट जंगल याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत घरातील प्रत्येक सदस्याने संगोपनासहित विविध प्रकारचे वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे तसेच विविध फळांचे फुलांचे झाडे लावावी अथवा या पावसाळ्यात लावण्याचा संकल्प करावा. आपल्या देशावर असलेल्या पर्यावरण संकटात हातभार लावत एक आदर्श निर्माण करत देश पर्यावरण मुक्त होण्यास मदत करूया तसेच इतरही महापुरुषांची जयंती याच पद्धतीने साजरी करण्याचा आदर्श निर्माण करूया. वन है तो जल है, जल है तो कल है डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान

