Tuesday, June 16, 2026
Homeजळगावजीवनदान ब्लड ग्रुप व कपडा परिवारातर्फे कपडे वाटप

जीवनदान ब्लड ग्रुप व कपडा परिवारातर्फे कपडे वाटप

जीवनदान ब्लड ग्रुप व कपडा परिवारातर्फे कपडे वाटप

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील जीवनदान ब्लड ग्रुप व कपडा परिवार तर्फे तालुक्यातील बेलव्हाय येथे गरजू लोकांना १५ जून रोजी कपडे वाटप करण्यात आले . यात तीन घागरे ,पाच पैठण्या , 25 साड्या 20 ड्रेस लहान मोठ्यांचे कपडे असे वाटप करण्यात आले आहे .

यावेळी गृपचे अध्यक्ष सतिष महाजन , वर्षा सतीश महाजन , पवन मुरलीधर भारंबे , जितेंद्र कोळी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता सुधाकर नेहेते व सहकारी मंडळी उपस्थित होते . याप्रसंगी कपडे मिळालेल्या गरजू महिला व लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या