लोकप्रिय आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे राजोरे जिल्हा परिषद शाळेत वाटप

यावल. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१८
भाजपा तालुकाध्यक्ष सागरभाऊ कोळी यांच्या माध्यमातून आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या साहित्याचे सेट इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आमदार अमोल दादा जावळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शैक्षणिक साहित्य बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्रसंगी सागर कोळी तालुकाध्यक्ष भाजपा वैशाली पाटील मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगिता पाटील,शक्ती केंद्रप्रमुख मयूर महाजन,राजेंद्र महाजन, बापू कोळी,सोपान कोळी,हर्षल जावळे,प्रभाकर खंबायत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

