Wednesday, June 17, 2026
Homeजळगावसाकेगांव येथील शेतकऱ्याचे आमरण उपोषण आश्वासना नंतर स्थगित

साकेगांव येथील शेतकऱ्याचे आमरण उपोषण आश्वासना नंतर स्थगित

साकेगांव येथील शेतकऱ्याचे आमरण उपोषण आश्वासना नंतर स्थगित

 

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

तालुक्यातील साकेगाव येथे पीक कर्ज न मिळाल्याने वि.का सोसायटी समोर बसलेल्या अशोक रंगनाथ कुरकुरे या शेतकऱ्या ने लेखी आश्वासना नंतर तिसऱ्या दिवशी मागे घेतले आहे .

सोसायटी चेअरमन राजेंद्र बाबुराव पाटील व संचालक परिक्षित बऱ्हाटे यांनी कुरकुरे यांची भेट घेतली कर्ज मंजूर झाल्याचे व दिलेल्या पत्रा बाबत चौकशी १५ दिवसात करून अहवाल देण्याचे लेखी पत्र दिले आहे व यावेळी थंड पेय देवुन अशोक कुरकुरे यांचे उपोषण सोडविले आहे . याप्रसंगी वि .का सोसायटीचे संचालक संतोष भोळे , राजेंद्र बारकू पाटील , पांडूरंग पाटील , किसन पाटील , दिलीप वाघोदे , नामदेव भोई , ज्ञानेश्वर सपकाळे , सेक्रेटरी योगेश कोळी व अरविंद पाटील उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या