श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जगदिश कवडीवाले यांची बिनविरोध निवड.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१७ येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत एकनाथ चौधरी यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर दि. १७ जुन रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या विषेश सभेत जगदिश रत्नाकर कवडीवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदाच्या जागे साठी जगदिश कवडीवाले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.त्यामुळे अध्यासी अधिकारी यांनी जगदीश कवडीवाले यांची बिन विरोध निवड झाली असल्याचे जाहिर केले .
यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष हेमंत चौधरी,माजी अध्यक्ष शरद यावलकर,उपाध्यक्ष उमेश कवडीवाले,महेश वाणी,दिलीप नेवे,यशवंत सोनवणे,तेजस यावलकर,नितीन हडपे.तज्ञ संचालक गणेश बुरुजवाले,सुनिता गडे तसेच बँकेचे सिईओ चंद्रकांत वाणी हे उपास्थित होते.अध्यासी अधिकारी म्हणुन सहाय्यक निवंधक अच्युत भागानगरे हे होते. या वेळी बँकेला यशो शिखरावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करू असे नुतन अध्यक्ष जगदिश कवडीवाले यांनी सांगीतले .

