Friday, June 19, 2026
Homeजळगावविधान परिषद निवडणुकीत यावल नगरपालिकेच्या २ सदस्यांनी 

विधान परिषद निवडणुकीत यावल नगरपालिकेच्या २ सदस्यांनी 

विधान परिषद निवडणुकीत यावल नगरपालिकेच्या २ सदस्यांनी

सप्रेम भेट नाकारली.

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          दि.१८   विधान परिषद निवडणूक रिंगणातील उमेदवारासाठी आज मतदान घेण्यात आले, मतदान होण्यासाठी काही सदस्य असलेल्या मतदारांना राजकीय पक्षांकडून ३ ते ४ पेट्या वजना इतकी भेटवस्तू देण्यात आल्याची तसेच यावल नगर परिषदेच्या दोन नवनिर्वाचित सदस्यांनी ती सप्रेम भेट नाकारल्याची राजकारणात, समाजात यावल शहरात चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज सात केंद्रावर मतदान झाले.मतदानासाठी प्रशासन सर्वोतोपरी सज्ज होते तरी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून काही राजकीय पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधी मतदार सदस्यांना तीन ते चार पेट्या इतक्या वजनाची सप्रेम भेट दिली.

 

विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या पूर्वसध्येपर्यंत राजकीय घडामोडी कशा प्रकारे झाल्या हे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील जनतेला चांगल्या प्रकारे समजले असले तरी विधान परिषद निवडणुकीतील काही सुज्ञ आणि स्वाभिमानी मतदारांनी आपला स्वाभिमान,अभिमान कायम ठेवून राजकीय पक्षाच्या सप्रेमभेटी घेण्यास नकार दिला त्यात यावल नगरपालिकेचे चौधरी आणि बारी नामक सदस्यांनी सप्रेम भेट नाकारल्याची यावल शहरात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या