पाण्याअभावी भोकर नदीपात्रात पडून असलेल्या गणेशमूर्तींचे तापी नदीत विसर्जन


रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील पुनखेडा येथे युवकांचा स्तुत्य उपक्रम
रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील भोकर नदीपात्रात काही भाविकांनी गणपती विसर्जन केले होते. मात्र, नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे काही गणेशमूर्ती अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच श्रद्धा सबुरी बूट हाऊसचे संचालक व ब्लॉगर चि. तुषार रामचंद्र कोळी यांनी गावातील युवकांच्या मदतीने नदीपात्रात पडून असलेल्या सर्व गणेशमूर्ती एकत्रित केल्या. त्यानंतर या गणरायांचे तापी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले.
या सामाजिक व धार्मिक उपक्रमात धनराज कोळी, रुपेश चौधरी, अविनाश चौधरी, अतुल सपकाळे, भैया पाटील,भूषण पाटील, गणेश कचरे, हर्षल पाटील, धनपाल रायमाळे,सोनू चौधरी, मोनू चौधरी,सौरव चौधरी, श्रेयश चौधरी नेतिक पाटील यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते.
गणेशमूर्तींचा सन्मान राखत त्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार हा परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

